पुरंदर मेडिकल फांऊडेशनचे चिंतामणी हॉस्पिटल

तज्ज्ञ डॉक्टरांनी पुरंदर मेडिकल फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘योग्य सल्ला व योग्य उपचार’ हे ध्येय समोर ठेऊन ‘चिंतामणी हॉस्पिटल′चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे. पुरंदर तालुका व परिसरातील सर्व रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, मार्गदर्शन, सर्व तपासण्या, शस्त्रक्रिया या एकाच छत्राखाली उपलब्ध करुन देणे हा ‘चिंतामणी हॉस्पिटल′चा प्रमुख हेतू आहे.

आवश्यक त्या साधन सामुग्रीने सुसज्ज, निवासी डॉक्टर, अनुभवी परिचारिका व स्टाफ यांच्यासह सदर रुग्णालय रुग्णसेवेसाठी २४ तास सज्ज आहे. सर्व प्रकारच्या आव्हानांना पेलण्याची क्षमता असणारे पूर्णवेळ तज्ज्ञ डॉक्टर्स २४ तास उपलब्ध आहेतच, शिवाय विशिष्ट अत्यावश्यक सेवांसाठी पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा आहे.

चिंतामणी हॉस्पिटल चे डॉ. रावळ (एम् डी) म्हणतात, ‘पुरंदर तालुका व सासवड शहरातील सर्व नागरिकांच्या प्रेम व सहकार्याच्या पाठबळावर तसेच ‘योग्य सल्ला व योग्य उपचार’ हेच ध्येय ठेवून आम्ही समविचारी डॉक्टरांनी नवीन महत्वकांक्षी प्रकल्प पुरंदर मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्णत्वास नेला आहे.

मोठ्या शहरात वैद्यकीय सेवेसाठी अफाट खर्च येतो. माफक दरात अत्याधुनिक सुविधा पुरविण्याचा आमचा प्रयत्न राहील. रुग्णाला त्याच्या आजाराची योग्य कल्पना देऊनच त्यावर उपचार केला जाईल. ‘एक विश्वास ठेवण्याजोग ठिकाण – चिंतामणी हॉस्पिटल′ हे नामाभिधान सार्थ करू.’