कानिफनाथ

नाथ पंथामधील कानिफनाथ यांचे मंदिर सासवड पासून १५ किलो मीटर अंतरावर सासवडच्या पश्चिमेकडे बापदेव घाट मार्गावर आहे. बोपगाव पासुन उजवीकडे मंदिराची कमान लागते वेडी वाकडी वळणे घेत घाटरस्ता संपल्यानंतर गाडी पार्किंगसाठी मोठे पटांगण आहे.

नावः कानिफनाथ

ठिकाणः कानिफनाथ

अंतरः सासवडपासून १५ किमी.

कसे जाल? सासवड कानिफनाथ बससेवा

चित्रदालन पहा

नाथ पंथामधील कानिफनाथ यांचे मंदिर सासवड पासून १५ किलो मीटर अंतरावर सासवडच्या पश्चिमेकडे बापदेव घाट मार्गावर आहे. बोपगाव पासुन उजवीकडे मंदिराची कमान लागते वेडी वाकडी वळणे घेत घाटरस्ता संपल्यानंतर गाडी पार्किंगसाठी मोठे पटांगण आहे.

थोड्या पायर्‍या चढून गेल्यानंतर नव्याने उभारलेला सभामंडप दिसतो, पंचक्रोशीतील लोकसहभागातून या मंदिराचा कायापालट झाला आहे. मुळचे मंदिर लहान आहे, मंदिरामध्ये जाण्यासाठी दरवाजा नसून खिडकी वजा १ फुट बाय १ फुटाची चौकट आहे, या चौकटीतून कितीही जाड असलेल्या व्यक्तीला सरपटत आतमध्ये जाता येते. आतमध्ये पंधरा वीस जण मावू शकतील एवढा मोठा गाभारा आहे.

आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोर दिसते ती यावनी दर्ग्या सारखी कानिफनाथांची समाधी. धूप व फुलांचा सुगंध मन प्रफुल्लीत करतो. ज्याप्रमाणे आतमध्ये प्रवेश केला तसेच बाहेर पडावे लागते. मुख्य गर्भगृहात स्त्रियांना प्रवेश नाही तसेच पुरुषांसाठी सदरा व कंबरपट्टा बाहेर काढुनच आत प्रवेश करावा लागतो.

या टेकडीवरून दिवेघाट तसेच मस्तानी तलाव दिसतो. पावसाळ्यामध्ये येथून निसर्गाचे विहंगम दृश्य दिसते त्यामुळे पावसाळ्यात येथे तरुणांची वर्णी मोठ्या प्रमाणात लागते.