श्री सिद्धेश्वर मंदिर

सासवडच्या पश्चिमेस सुमारे मैल-दीड मैल अंतरावर स्वयंभू महादेवाचे एक सूंदर मंदिर आहे. पुरातन काली पांडवांनी पांडेश्वरी यज्ञ केला. त्या वेळेस निर्माण झालेल्या शिवलिंगापैकी हे एक असावे असा धार्मिक समज आहे.

नावः श्री सिद्धेश्वर मंदिर

ठिकाणः सासवड

अंतरः सासवडपासून १ किमी.

कसे जाल? सासवडपासून रिक्षा उपलब्ध

सासवडच्या पश्चिमेस सुमारे मैल-दीड मैल अंतरावर स्वयंभू महादेवाचे एक सूंदर मंदिर आहे. पुरातन काली पांडवांनी पांडेश्वरी यज्ञ केला. त्या वेळेस निर्माण झालेल्या शिवलिंगापैकी हे एक असावे असा धार्मिक समज आहे.

निसर्गरम्य प्रशांत ठिकाणी कर्‍हेच्या पावन तीरावर हे शिवालय उभे आहे. शिल्पकलेचा एक आदर्श नमुना म्हणून मंदिराची बांधणी प्रसिद्ध आहे.

सरदार बिनीवाले यांच्याकडे मंदिराची व्यवस्था आहे. देवाची पूजाआर्चा, नंदादीप, नैवेद्य वगैरे धार्मिक कृत्यांकरता त्यांनी जमिनीचे उत्पन्न लावून दिले आहे या उत्पन्नातूनच देवालयासाठी होणारा खर्च भागविला जातो. मंदिरासमीपच कर्‍हानदीच्या पात्रात जिवंत पाण्याची एक विहीर असून सासवड नगरपालिकेने सासवड पाणी पुरवठा योजनेसाठी या विहिरीचा उपयोग केला आहे. एक सूंदर, निसर्गरम्य, मनमोहक अशी कलाकृती पहायची असेल तार सिद्धेश्वर देवस्थानास जरुर भेट द्या.