लक्ष्मीनारायण मंदिर

संत सोपान महाराजांच्या मंदिराकडे जाताना पुलाच्या अलीकडील टोकाशी आपले लक्ष वेधून घेते. या मंदिराची स्थापना ह. भ. प. कै. विठोबा भोसले ऊर्फ आंधळेबुवा यांनी सन १९२० च्या सुमारास केली.

नावः लक्ष्मीनारायण मंदिर

ठिकाणः सासवड

अंतरः सासवडपासून १ किमी.

कसे जाल? सासवडपासून रिक्षा उपलब्ध

 

संत सोपान महाराजांच्या मंदिराकडे जाताना पुलाच्या अलीकडील टोकाशी आपले लक्ष वेधून घेते. या मंदिराची स्थापना ह. भ. प. कै. विठोबा भोसले ऊर्फ आंधळेबुवा यांनी सन १९२० च्या सुमारास केली. बाबांनी अक्षरशः भिक्षा मागून या मंदिराच्या उभारणीस सुरुवात केली.

श्री. विश्वासराव जगताप यांनी मंदिरासाठी आपली जागा दिली. तर पिंपळ्याचे दानशूर शेठ पोमण यांनी लक्ष्मीनारायणाच्या संगमरवरी मनोहर मूर्ती दिल्या. अशा रीतीने धार्मिक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.प्रतिवर्षी आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर क्षेत्री सासवडहून चांगावटेश्वराची पालखीची प्रथा कै. विठोबा आंधळेबाबांनी सुरु केली. ती आजही चालू आहे.

कै. आंधळेबाबांच्या पादुका व छायाचित्र अनावरण समारंभ ह. भ. प. कै. सोनोपंत दांडेकर यांच्या हस्ते सन १९६३ साली झाला. कै. बाबांचे पवित्र कार्य म्हणजे “जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टाविती उपकारे” या उक्तीचे मूर्तिमंत उदाहरण होय.