संभाजीराजे गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पुरंदर शाखेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात वैविध्यपूर्ण व भरीव कामगिरी करणार्‍या ३५ शिक्षकांना छत्रपती संभाजीराजे गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

रविवारी (दि. २२) दुपारी २ वाजता सासवड (ता. पुरंदर) येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. मिरासदार यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम पुरस्कार सोहळ्यानंतर रंगला.

पुरंदर तालुक्यातील शिक्षकांनी उच्चपदावर झेप घेतली, त्यांचाही गुणगौरव करण्यात आला.

त्यांची नावे पुढीलप्रमाणे- नामदेव शेंडकर (विभागप्रमुख से. प्र. जि. शि. व. प्र. सं. पुणे), रामदास वालझाडे (गटशिक्षणाधिकारी, भोर), विजया टाळकुटे (गटशिक्षणाधिकारी, म्हसळा), मीना शेंडकर (गटशिक्षणाधिकारी, पनवेल), संध्या गायकवाड (गटशिक्षणाधिकारी, खंडाळा), ज्योती परिहार (गटशिक्षणाधिकारी, पुरंदर), नीलिमा म्हेत्रे (शिक्षण विस्तार अधिकारी, पुरंदर).
छत्रपती संभाजीराजे गुणवंत शिक्षक पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे (कंसात शाळेचे नाव) – सोमनाथ गायकवाड (केंद्रप्रमुख, वाल्हे), अनंत उरसळ (मुख्याध्यापक, दिवळे), सुरेश जाधव (मुख्याध्यापक, देवडी), पुष्पा काळाणे (मुख्याध्यापिका, एखतपूर), सुशीला हिंगणे (मुख्याध्यापिका, झेंडेवाडी), आनंदी म्हेत्रे (मुख्याध्यापिका, आळंदे), रेखा टिळेकर (कवटेमळा), दत्तात्रेय बारगजे (पठारवाडी), सुहासिनी पवार (सोमुर्डी), निशा वढणे (मिसाळवाडी), अनिता वाघोले (तोंडल), तानाजी खेडेकर (यादववाडी), आशा जगताप (सणसवाडी), समिंद्रा पांडव (घारमळकरवाडी), सुवर्णा खेडेकर (आंबोर्डी), रवींद्र पवार (मांडळी), सुलक्षणा पवार (अंबाजीची वाडी), अनिल कुंजीर (नाझरेसुपे), ज्योती पानसरे (रोमणवाडी), वैशाली खोमणे (धालेवाडी), सारिका रासकर (जेजुरी नं. २), अनिल गळंगे (चिल्हावळी), तुकाराम ताम्हाणे (भगतवस्ती), स्वाती गायकवाड (सिंगापूर), विद्या पवार (दिवे), अरुणा गिरे (सासवड न.पा.), महेशकुमार घाडगे (उरुळी देवाची), आशा कुंजीर (टिळेकरवाडी), विकास लवांडे (शेलारवाडी), रंजना खेडेकर (डाळींब), मंगेश राऊत (निरगुडवाडी), प्रितम बारभाई (घावर), कल्पना दिलीप काटे (सासवड न. पा. क्र. ५).

दि. २० एप्रिल २०१२ (वार्ताहर)
लोकमत