सासवडच्या ‘वनपर्यटना’साठी ४.६० कोटी

सासवड – येथील सासवडच्या वाघडोंगर वनपर्यटनस्थळासाठी चार कोटी साठ लाखांच्या कामाला मंजुरी दिली आहे. त्यातील पहिला टप्पा २.१८ कोटींचा आता सुरू होत असून, भविष्यात हे चांगले पर्यटनस्थळ म्हणून विकसित होईल, असा विश्‍वास राज्याचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सासवड (ता. पुरंदर) येथे व्यक्त केला.

येथील वनविभागाच्या वाघडोंगर परिसर पर्यटन विकास प्रकल्पांतर्गतच्या पहिल्या टप्प्यातील विकासकामांचे भूमिपूजन काल डॉ. कदम यांच्या हस्ते झाले. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या निमित्त लगतच्या मैदानावर कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावाही झाला.

राज्यात वनविभाग शंभर कोटी झाडे लावणार आहे. सध्या २१ टक्‍क्‍यांवर असलेले वन ३३ टक्‍क्‍यांपर्यंत वाढविले जाणार आहे. वनांचा वीस टक्के नफा स्थानिक विकासाला दिला जाईल, असे धोरण तयार केल्याचेही वनमंत्री डॉ. कदम म्हणाले.

- सकाळ वृत्तसेवा