गुळूंचे ज्योतिर्लिंग मंदिर

नीरा शहरापासून पाच कि. मी. अंतरावर असलेल्या मौजे गुळूंचे येथे जागृत देवस्थान श्री ज्योतिर्लिंग आहे. संपूर्ण महाराष्ट्रात “काटेबारस’ या नावाने प्रसिध्द असणाऱ्या यात्रेला राज्यातील विविध भागातून हजारो भाविक आवर्जून हजेरी लावतात. पुरंदर तालुक्यातील गुळूंचे ही यात्रा महाराष्ट्रात “काटेबारस’ यात्रा म्हणून प्रसिध्द  आहे.

Sopankaka Devasthanनावः ज्योतिर्लिंग मंदिर

ठिकाणः गुळूंचे

अंतरः सासवडपासून ३५ किमी.

कसे जाल? निरा बससेवा/ निरा पासून रिक्षा उपलब्ध

“हर बोला… हर… हर-हर महादेव” असा जयघोष करीत ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल-खोबऱ्याची उधळण करीत, उघड्या अंगाने बाभळीच्या काट्यांच्या ढीगामध्ये पाण्यात सूर मारावा अशा उड्या घेवून काट्यांमध्ये लोळणारे पुरुष भक्तांचे अक्षरश: अंगावर काटाच आणणारे रोमांचक दृष्य नीरानजिक मौजे गुळूंचे (ता. पुरंदर) येथील “काटेबारस’ यात्रेत हजारो भाविक अनुभवतात. “काटेबारस” यात्रेनिमित्त गुळूंचे परिसरासह राज्यातील विविध भागातून हजारो भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

नीरा शहरापासून पाच कि. मी. अंतरावर असलेल्या मौजे गुळूंचे येथील जागृत देवस्थान श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कार्तिक शु।। द्वादशीला मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात “काटेबारस’ साजरी केली जाते. संपूर्ण महाराष्ट्रात “काटेबारस’ या नावाने प्रसिध्द असणाऱ्या यात्रेला राज्यातील विविध भागातून हजारो भाविक आवर्जून हजेरी लावतात.

जागृत स्वयंभू ज्योतिर्लिंगाचे भक्त बाभळीच्या काट्यांच्या ढीगामध्ये पाण्यात सूर मारावा अशा उघड्या अंगाने उड्या घेतात, हे या यात्रेतील प्रमुख वैशिष्ट्य असल्याने पुरंदर तालुक्यातील गुळूंचे ही यात्रा महाराष्ट्रात “काटेबारस’ यात्रा म्हणून प्रसिध्द  आहे.

पालखीमागून आलेले देव अर्थात अंगात वारे आलेले पुरुष भक्त रचलेल्या काट्यांच्या ढीगांमध्ये “हर-हर महादेव’ असा जयघोष करीत एका-मागून एक असे उघड्या अंगाने उड्या घेवून काट्यांमध्ये अक्षरशः लोळतात. असे रोमांचकारी दृश्य पाहून उपस्थित हजारो भविकांच्या अंगावर खरोखर काटा येत होता. काट्यामध्ये उड्या घेणाऱ्या भक्ताला मंदिरात नेवून त्याच्या अंगावर राखेची विभूती टाकली जात होती.

गुळूंचे येथील ज्योतिर्लिंग देवस्थान व परिसराच्या विकासासाठी ग्रामस्थांनी विकास आराखडा करून ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून सुमारे 70 लाख रुपये खर्चाचे जीर्णोध्दार व परिसर विकासाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. गुळूंचे येथील ग्रामदैवत ज्योतिर्लिंग देवस्थानला पर्यटनस्थळाचा “क’ दर्जा मिळालाय. त्यामुळे या देवस्थानाच्या विकासाला हातभार लागणार आहे.

सौजन्य: अजित निगडे आणि dainikaikya.com