हजारो भाविकांनी वीर गजबजले

मार्गशीर्ष अमावास्येनिमित्त थंडी असूनही पुरंदरमधील वीर येथे हजारो भाविकांनी श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्‍वरीचे दर्शन घेतले.
अमावस्येनिमित्त पहाटे ४.३0 वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी ६ वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक करण्यात आला. देऊळवाड्यात दगडी कासवावर पारंपरिक सालकरी गोसावी मंडळींच्या पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता. शंकरराव वामनराव धुमाळ, वीर व सदाशिव सातव बारामती यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष पी. जे. धुमाळ, उपाध्यक्ष कुमार धुमाळ, विश्‍वस्त तानाजी धुमाळ, परशुराम धुमाळ, रतन धुमाळ, रामचंद्र पिलाणे, नामदेव जाधव, काशिनाथ चवरे, ज्ञानेश्‍वर वचकल, सचीव तय्यब मुलाणी यांनी पिण्याचे पाणी, मंदिर व परिसर स्वच्छता, स्वयंसेवक दर्शनबारी, देवस्थान कर्मचारी इत्यादी व्यवस्था केली.

- लोकमत | सासवड | दि. ११ (वार्ताहर)