माया केअर सेंटर

आजच्या या धकाधकीच्या, धावपळीच्या जगात सुदृढ निरोगी अशा तरुणांना सुद्धा ह्या धावपळीचा सामना करताना धाप लागते. मग वयोवृद्धांना, अपंगांना, अंथरुणाला खिळलेल्या वं काही अंशी आजार असणाऱ्या मुलामुलींचा निभाव या धावत्या जगात कसा लागणार? अशाकडे आपुलकीने, माणुसकीने कोण बघणार? त्यांच्याकडे घरातील अडगळ, कटकट म्हणूनच संबंधित पाहणार. त्यांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांच्यावर मायेची पाखर कोण घालणार?

मंदबुद्धी मुलामुलींनाच नाही, तर वृद्धांना अपंगांना मायेची ऊब मिळाली, तर त्यांचे दुखः, त्यांच्या वेदना कमी होणार आहेत हे लक्षात घेऊन आम्ही अशा गरजूंना “माया केअर सेंटर” मधून जगण्याची उर्मी, उर्जा, बळ, ताकद सर्व काही देण्याचा प्रयत्न करीत आहोत. आयुष्यभर मुलासाठी भरपूर माया जमवली. नातेवाईकांना मदत केली त्यांच्या सुख दुःखात आपल्या परीने मदतही केली, परंतु वृधापनात निसाह्य अवस्थेत सर्वांनीच माघार घेतली वं अशा गरजूंसाठी मात्र त्यांच्या मनातील मायेचा झरा आटलेला पाहूनच आम्ही आमच्या मायेच्या विश्वासावर त्यांना सहानभुती न दाखवता मायेच्या वर्षावाने त्यांचे जीवन आनंददायी, जगण्यातला आनंद, प्रेम मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय त्यासाठी पुरंदर तालुक्यातील अंबोडी गवत इन्द्रप्रस्थ वनराई मध्ये “माया केअर सेंटर” सुरु केले आहे.

सुविधा:

• वेळेवर चहा नाष्टा, फलहार वं जेवण
• प्रत्येकास स्वतंत्र बेड
• वाचण्यासाठी दैनिक वं साप्ताहिक वृतपत्र
• करमणुकीसाठी कॅरम, बुद्धिबळ वं टीव्ही
• नियमित वैद्यकीय तपासणी
• वर्षातील महत्वाचे सण साजरे
• सर्व सदस्यांच्या समवेत सर्वांचा वाढदिवस
• टॉयलेट ची उत्तम सोय
• रुग्णांना आजार प्रमाणे आहार व्यवस्था
• वर्षातून दोन सहली

माया परिवाराचे सदस्य होऊन आपण मासिक देणगी देऊन या उपक्रमाला हातभार लावू शकता. आपल्या मायेच्या अंकुराने हा वटवृक्ष मोठा होणार आहे.
आपल्या ॠणांट राहणे आम्हास निश्चितच आवडेल. संस्थेला दिलेली देणगी आयकर क्र. ८० जी अंतर्गत करसवलतीस पात्र.

अधिक माहितीसाठी संपर्क: श्री. संजीव भाटे – ७२७६६४७४७० अॅड. श्री. विक्रम संजीव भाटे – ९३७१६३९६२१