म्हस्कोबाच्या दर्शनासाठी हजारो भाविक

आषाढ वद्य अमावास्येनिमित्त पुरंदरमधील श्रीक्षेत्र वीर येथे हजारो भाविकांनी  श्रीनाथ म्हस्कोबा आणि देवी जोगेश्वरीचे दर्शन घेतले. पहाटे साडेचार वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. त्यानंतर सकाळी ६ वाजता भाविकांना दर्शनासाठी तो खुला करण्यात आला.  सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक करण्यात आले.

 दुपारी १२ वाजता देवाची धूपारती होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात  आला.  दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी गाभारा पुन्हा दर्शनासाठी खुला करण्यात आला. दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची रीघ लागली होती.
दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शन घेतले. या वेळी  गणपत धुमाळ, रामचंद्र धुमाळ, विठ्ठल धुमाळ यांच्यातर्फे   महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. देवस्थान ट्रस्टतर्फे पिण्याचे पाणी, लाईट, दर्शनबारी, वाहनतळ, परिसर स्वच्छता, जादा कर्मचारी, स्वयंसेवक आदी व्यवस्था करण्यात आली. या वेळी वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांनी नियोजन केले.  या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ,  संभाजी धुमाळ,  दिलीप धुमाळ, ज्ञानेश्वर धुमाळ, मंगेश धुमाळ,
बबन धुमाळ, नामदेव जाधव,
अशोक वचकल, सुभाष समगीर, सचिव तय्यद मुलाणी आदी उपस्थित होते.
4आषाढ वद्य अमावास्येनिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 1क् वाजता देवाला भाविकांच्या दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या. देऊळवाडय़ात दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळींचा पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता.
आभारः lokmat.com