सासवडसारखी पवित्र भुमी आणि तेथील अनेक पुरातन अशी मंदिरे. त्यापैकी पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारे असे चांगवटेश्वर. चांगवटेश्वर देवस्थानाची रचना आणि सुंदरता पाहून अनेक चित्रपटनिर्मात्यांनीही या स्थळाचा उपयोग करुन घेतला आहे.
मंदिर असो वा निसर्ग त्याचे सौंदर्य टिकवून ठेवणे आपल्या हातात आहे हे जाणून मंदिरामध्ये अभ्यासासाठी येणार्या विद्यार्थ्यांनी १९९२ ला एकत्र येऊन मंदिराचे व्यवस्थापनासाठी ‘श्री. चांगवटेश्वर देवस्थान सुधार समिती’ स्थापन केली. समितीचे कार्य स्वकृतीतून समृद्धिकडे या तत्त्वानुसार चालते. सुधार समिती स्वाध्याय परिवाराचे पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे. मंदिर व्यवस्थापनाचा खर्च हा सुधार समितीचे जे सदस्य आर्थिक दृष्ट्या स्क्षम आहेत त्यांनी दरमहा जमा केलेल्या निधीतून केला जातो. मंदिरास कुठल्याही देणग्या किंवा मानधन मिळत नाही.
‘श्री. चांगवटेश्वर देवस्थान सुधार समिती’ यांजकडून राबविले जाणारे उपक्रम:
- महाराष्ट्रशासनाचे संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान व निर्मलग्राम या धर्तीवर निर्मल मंदिर व वृक्षमंदिर हे प्रयोग यशस्वी
- सन २००५ मध्ये भिवडी येथील आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचे स्मारक दुर्लक्षित होते, तेथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले
- रोटरी क्लब हिलसाइड यांचे सहकार्याने मंदिर परिसरामध्ये पर्यटकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था
- पुणे महानगर परिवहन सेवेतील चालक वाहक यांनी सहकार्यक्षम आदर्श चालक वाहक पुरस्कार देऊन प्रोत्साहन
- ऑक्टोबर २००४ मध्ये श्वास ऑस्कर फंडासाठी मदत
- सप्टेंबर २००४ मध्ये स्वातंत्र्य सेनानी कै. आनंदरावमामा जगताप यांचे स्मारकांची मागणी
- सुधार समितीचे सदस्यांचा वाढदिवस वृक्षरोपणाने साजरा करुन कस्तुरबा आश्रम ट्रस्टचे विद्यार्थ्यांसोबत साजरा केला जातो. वृक्ष दत्तक योजना
- जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस वृक्ष भेट देवून केला जातो
- सासवड नगरपालिकेची शेटेवस्ती शाळेसाठी विद्यार्थ्यांना वृक्ष दत्तक योजना
Nice Work !!!!!!!!!!!
good work
Thank you so much @raju Shingade